कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्याचे राज्यातल्या नेत्यांकडून कौतुक
जनता कर्फ्यूच्या काळात सायंकाळी पाच वाजता कोरोनाशी लढा देण्यात सक्रीय असलेल्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला देशभरात प्रतिसाद मिळाला. रावसाहेब दानवे, सुजय विखे पाटील, अतुल सावे अशा विविध नेत्यांनी सहकुटुंब आपल्या घराच्या दारात येत टाळ्या वाजवून कोरोनाशी लढणाऱ्याचे कौतुक केले