OBC Morcha : ओबीसीचा मोर्चा; नाना पटोलेंची तोफ बारामतीत धडाडणार
Pune : ओबीसी एल्गार महामोर्चाचे निमंत्रण नाना पटोले यांनी स्वीकारले असून ''मी येणार'' असे म्हणाले तर विजय वडेट्टीवार यांनी, ''मी येणारच'' आहे. 29 जुलै च्या ओबीसी एल्गार महामोर्चा ला नाना पटोले ,छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये ओबीसी महामोर्चामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहे. ओबीसी आरक्षण कृती समितीमार्फत महाराष्ट्रातील पाहिला महामोर्चा घेण्यात येणार आहे.
#NanaPatole #OBCMorcha #OBCReservation #pune