Surprise Me!

यवतमाळ : एटीएम कार्ड क्लोन करून पैसे चोरणाऱ्या टोळीला बिहारमधून अटक

2021-10-13 89 Dailymotion

एटीएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे उडविणार्‍या आंतरराज्यीय टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. सायबर सेलच्या पथकाने बिहार राज्यात जाऊन ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एटीएम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करीत थेट बिहार गाठले. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींच्या ताब्यातून इंटरर्नल एटीएम स्कॅनर, हॅन्ड एटीएम स्कॅनर, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर, १५ एटीएम व रोख रक्कम असा एकूण एक लाख २८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.