वडणगे - येथील शिवपार्वती तलावाच्या रखडलेल्या कामाबाबत आज जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामस्थांमध्ये बैठक झाली. भिंतीच्या बांधकामाच्या तांत्रिक आराखड्यास पुणे जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून 15 दिवसांत मंजुरी मिळवून घेण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. त्यामुळे तांत्रिक आराखड्याच्या मंजुरीवर तलावाच्या सुशोभिकरणाचे भवितव्य ठरणार आहे. (व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#vadnage #shivparvati #shivparvatitalav