Surprise Me!

महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली आर्या मांगेच्या कुटुंबियांची भेट

2022-01-15 113 Dailymotion

घाटकोपरमध्ये 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर पसरली. मुंबई महानगरपालिकेच्या ट्रायल लसीकरण दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पसरली. या सर्व प्रकारानंतर मुंबई महानगरपालिकेने मुलीच्या कुटुंबाशी संपर्क साधत विचारपूस केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी महापौरांनी तरुणीच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून सविस्तर माहिती घेतली. आर्याला दहावीच्या परीक्षेचं टेन्शन असल्याचं तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. सात दिवसांपूर्वी आर्याने आपल्या भावंडांसह कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. याच दरम्यान तिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. यादरम्यानच तिला हृदयविकाराच्या झटका आल्याने तिचं निधन झाल्याचं स्पष्ट झालयं. महापौरांनी सोशल मीडियावर खोटे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.