मंडणगड:शेकडों वर्षांपासून पूर्वापार चालत आलेली महाशिवरात्रीला पूर्वजांच्या समाधी पूजनाची परंपरा आजच्या विभक्त कौटुंबिक पद्धतीतही कुटुंबांची वीण कायम घट्ट करणारी ठरते. सुखदुःखात एकमेकांच्या मदतीला उभे राहणारे सर्वजण एकत्र येत असल्याने ही परंपरा कौटुंबिक महत्व अधोरेकीत करणारी आहे. महाशिवरात्रीला परंपरा; जुन्या आठवणींना उजाळा; विभक्त कुटुंब येतात एकत्र ही प्रथा कोकणात महाशिवरात्रीला गावोगावी सर्वत्र तितक्याच श्रद्धेने जोपासण्यात आली. पूर्वी कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेवर समाधी बांधण्यात येत असे. आजही तालुक्यातील गावोगावी शेकडोंच्या संख्येने कलेचा उत्तम नमुना असणाऱ्या समाधी पाहायला मिळतात. महाशिवरात्रीला गावोगावी या समाधी पूजण्याची परंपरा आहे.
(बातमीदार- सचिन माळी)
#mandangad #legacy #mandangadnews #parampara #mahashivratri #mahashivratrinews