Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. भाजपसाठी ही निवडणूक फारशी कठीण नसली तरी मित्रपक्षांसह सर्व विरोधी पक्षांशीही संवाद साधत उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आता भाजपने 'मॅनेजमेंट टीम' तयार केली आहे. संपूर्ण निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या टीमवर असणार आहेत.