अहिल्यानगर : समाजातील तरुणांना सक्षम बनवण्याचे काम सध्या हाती घेतले असून, महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना आर्थिक सक्षम बनवणार आहे. त्याचप्रमाणे पूर्वीपासून मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका आमची राहिली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये जे आरक्षण दिले होते ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे आरक्षण गेले. परंतु, आता पुन्हा फडणवीस यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली आहे, अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी दिली.
मराठा समाजातील नवउद्योजकांना चालना देण्यासाठी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बैठक घेतली.