Surprise Me!

श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिरात दर्शनसाठी भाविकांच्या रांगा

2025-08-11 4 Dailymotion

बीड - श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रातील जागृत ज्योतिर्लिंगांपैकी 1 असल्यामुळे या मंदिराचे विशेष महत्त्व आहे. श्रावणात, विशेषतः सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. परळी वैजनाथ मंदिरातील व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण सोमवारनिमित्त मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवले आहे. भाविकांसाठी जलाभिषेक, रुद्राभिषेक अशा विविध पूजांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वैजनाथ शिवशंभुचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात दूर दूरवरुन भाविक येतात. श्रावणातील सोमवार असल्यानं या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार असल्यानं दर्शन रांगेसाठी मंडप घालून वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एकत्र गर्दी होणार नाही.