Surprise Me!

पाणलोट परिसरात मुसळधार पाऊस; उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण भरले

2025-08-20 4 Dailymotion

अकोले (अहिल्यानगर) :  उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) जोरदार पाऊस झाला. धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 6 वाजता धरणाच्या स्पिलवेमधून 11406 क्युसेक तर वीज निर्मितीसाठी 850 क्युसेक असा 12 हजार 231 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच टप्प्याटप्याने या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. नदीपात्रात कोणी प्रवेश करु नये, कुठलीही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असं आवाहन, प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर भंडारदरा परिसरात अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्यानं नटलेले अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवेमुळं पर्यटकांचं आकर्षण केंद्र मानलं जातं.