Surprise Me!

शिवसेना–शेकापच्‍या महिला आघाडीत हातघाई; दोन्‍ही पक्षांकडून एकमेकांविरोधात निषेध आंदोलन

2025-08-20 12 Dailymotion

रायगड : मंगळवारी शिवसेना नेत्‍या आणि आमदार महेंद्र दळवी यांच्‍या पत्‍नी मानसी दळवी तसंच शेकापच्‍या महाराष्‍ट्र प्रवक्‍त्‍या चित्रलेखा पाटील यांच्‍यातील हातघाई प्रकरण अद्याप शांत झालेलं नाही. या घटनेनंतर आज दोन्‍ही पक्षांकडून एकमेकांविरोधात निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला. रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील मिठेखार येथे सोमवारी रात्री झालेल्या दरड दुर्घटनेत विठाबाई गायकर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी मंगळवारी शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील या दोघी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घटनास्थळी पीडित कुटुंबीयांसोबत चर्चा सुरू असताना राजकीय वातावरण चिघळलं. चित्रलेखा पाटील यांनी चर्चेदरम्यान "५० खोके" असा उल्लेख केला. या वक्तव्यावरून मानसी दळवी संतापल्या आणि त्यांनी चित्रलेखा पाटील यांना जाब विचारला. काही क्षणातच वाद चिघळला आणि हातघाईपर्यंत प्रकरण गेले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये मोठा गोंधळ उडाला. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. सकाळी शेतकरी कामगार पक्षाकडून शेतकरी भवन समोर निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये शिवसेनेच्या आमदार दळवी यांच्यावर आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला. तर दुपारी शिवसेनेकडून प्रतिउत्तरादाखल निदर्शने करण्यात आली. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.