Surprise Me!

पुण्यात मराठा समाजाचा फटाके फोडत, पेढे वाटत जल्लोष

2025-09-02 4 Dailymotion

पुणे - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केलं होतं.आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यात अनेक विषयांवर एकमत झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन विजयी झाल्याची घोषणाही जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यावर आज पुण्यात स्वारगेट चौक येथे पेढे वाटप करून मराठा बांधवांच्या वतीने फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक मराठा...लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला. यावेळी मराठा बांधव म्हणाले की गेल्या ४० वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होता. आण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाना आज संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यश मिळालं आहे.