Surprise Me!

थायलंडचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल; पाहा व्हिडिओ

2025-09-06 38 Dailymotion

मुंबई : आज अनंत चतुर्दशी आहे. मोठ्या भक्ती भावात आणि जड अंतकरणाने मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गणपती विसर्जनासाठी मुंबईतील गणपती आता गिरगाव चौपाटीवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यात घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपतीचा देखील समावेश आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा जयघोषात मुंबईकर बाप्पाला निरोप देताना गिरगाव चौपाटीवर दिसून येत आहेत. अशातच सर्व मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं ते एका परदेशी गणपतीने. हा गणपती म्हणजे 'थायलंडचा राजा'. थायलंडच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या गणपतीचं तिसरं वर्ष असून, मोठ्या भक्ती भावात चर्नी रोड येथील शांती निवास हॉल येथे हा गणपती विराजमान केला जातो. यावर्षी या गणपती बाप्पाच्या सोहळ्यासाठी थायलंडहून तब्बल 60 नागरिक मुंबईत दाखल झाले असून, ते नरिमन पॉईंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये निवासासाठी आहेत. हे परदेशी पाहुणे बाप्पाच्या आरतीसाठी आणि सकाळ आणि संध्याकाळीच्या पूजेसाठी शांती निवास हॉल येथे येतात. थायलंडमध्ये देखील आपला सनातन धर्म पाळला जातो आणि याच श्रद्धेपोटी आपल्या बाप्पाच्या पूजेसाठी हे थायलंडचे नागरिक दरवर्षी भारतात येतात, अशी माहिती या परदेशी पाहुण्यांची व्यवस्था करणाऱ्या शांती निवास हॉलच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.