मुंबई : शनिवारी मुंबईसह महाराष्ट्रा" /> मुंबई : शनिवारी मुंबईसह महाराष्ट्रा"/>
Surprise Me!

मुंबईतील गणेशोत्सवाची परदेशी पाहुण्यांना भुरळ; म्हणाले "भारत माझं दुसरं घर..."

2025-09-06 4 Dailymotion

मुंबई : शनिवारी मुंबईसह महाराष्ट्रात 10 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती हे ढोल-ताशा, डीजे, लेझिम पथकाच्या तालावर गणरायाचं विसर्जन केलं जातं. मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त येतात. तसंच परदेशातूनही अनेक लोक मुंबईतील गणेश विसर्जन पाहण्यासाठी येतात. यावेळी "गणपती विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतो. भारत आमच्यासाठी आमचं दुसरं घर आहे," अशी प्रतिक्रिया एका परदेशी पाहुण्यानं दिली. "विसर्जन सोहळा भव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. मी सहा वर्षांपासून खास गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईत येते," अशा प्रतिक्रिया अर्जेंटिनामधून आलेल्या महिलेनं दिली आहे. "मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. मी जगभरात फोटोग्राफी करतो. परंतु इथं फोटोग्राफी करायला मजा आणि उत्साह येतो," असं इस्रायलमधून आलेल्या फोटोग्राफरनं सांगितलं.