पुणे : पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूम धडाक्यात झाली. 'गणपती बप्पा मोरया'... 'मंगल मूर्ती मोरया...'च्या जयघोषात शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाला पुण्यात देखील निरोप दिला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. अकरा तासांनी मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन झालं. यानंतर मिरवणुकीत इतर मंडळ सहभागी झाली. शनिवारी पुण्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीत विविध ढोल ताशा पथकाकडून वादन, तसंच शंखनाद आणि पारंपरिक अशा पालखीत आणि आकर्षक फुलांची सजावटीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मोठ्या प्रमाणात यंदा गणेश भक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. दुसऱ्या दिवशी पुण्यात सुरू असलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील काही क्षण पाहुयात...